ठाणे येथे १८ लाख रुपयांचा गुटखा जप्त करून एकाला अटक
ठाणे, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – गुजरात येथून आलेल्या गुटख्याची महाराष्ट्रात तस्करी करणार्या मंजितकुमार गांगो राय याला खारेगाव टोलनाका येथे सापळा रचून कळवा पोलिसांनी अटक केली आहे. (कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नाही ! – संपादक) त्याच्याकडून महाराष्ट्रात बंदी असलेला १८ लाख रुपयांचा गुटखा, तसेच टेंपो असा एकूण २४ लाख ५१ सहस्र ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याला १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.