भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेकडून चीनच्या गुप्तहेर नौकेला तिच्या बंदरावर येण्यास अनुमती !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेने भारताच्या विरोधानंतरही चीनच्या गुप्तहेर नौकेला श्रीलंकेच्या बंदरावर येण्याची अनुमती दिली आहे. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी सांगितले, ‘चीनचे ‘शी यान-६’ ही नौका २५ नोव्हेबर या दिवशी श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे येणार आहे.’ भारताने या नौकेला केलेल्या विरोधाविषयी अली साबरी म्हणाले की, आमच्यावर अन्य देशांकडूनही दबाव होता; मात्र आम्हाला सर्व देशांसमवेत समतोल साधायचा आहे. (समतोल साधण्याच्या नावाखाली भारताला दुखावण्यात आले आहे, हे भारताने लक्षात घेऊन श्रीलंकेला धडा शिकवणे आवश्यक आहे ! – संपादक)
चीनची ही नौका संशोधनाच्या नावाखाली हेरगिरी करते. यावर बसवण्यात आलेल्या यंत्रणेद्वारे हेरगिरी केली जाते. या यंत्रणेला मिळालेली माहिती उपग्रहाच्या माध्यमातून चीनला पाठवली जाते. ही नौका श्रीलंकेत येऊन थांबल्यानंतर भारतातील दक्षिणेकडील केरळ, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू यांच्या किनार्यांवरील शहरे, नौदलाचे तळ यांची गोपनीय माहिती गोळा केली जाऊ शकते.
संपादकीय भूमिकाभारत ज्या देशांना साहाय्य करतो, त्यांतील बहुतेक देश भारताचा विश्वासघात करतात, असेच दिसून येते. यावरून भारताने कुणाला साहाय्य करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे ! |