उत्तर गाझामधील लोकांना २४ घंट्यांत दक्षिण गाझामध्ये जाण्याचा आदेश !
इस्रायल गाझा पट्टीत घुसण्याच्या सिद्धतेत !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने गाझा पट्टीतील उत्तर भागातील ११ लाख मुसलमानांना २४ घंट्यांत तेथून दक्षिण भागात जाण्याचा आदेश दिला आहे. यामुळे गाझा पट्टीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी दक्षिण गाझामध्ये जाण्यामुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
सौजन्य द सन
१. इस्रायलने हवाई मार्गाने गाझा पट्टीमध्ये या संदर्भातील पत्रके टाकली आहेत. यात पुढे असेही म्हटले आहे, ‘तुम्हाला पुन्हा या भागात कधी बोलवायचे ?’, हे आम्ही तुम्हाला योग्य वेळी सांगू. तुम्ही हमासचे आतंकवादी, जे मानवी ढाल म्हणून तुमचा उपयोग करत आहेत, त्यांच्यापासून दूर रहा.
२. इस्रायलने गाझाच्या सीमेवर सध्या साडेतीन लाख सैनिक, तसेच तोफा, रणगाडे आदी गोळा केले आहेत. यातून इस्रायल गाझा पट्टीत थेट घुसून कारवाई करणार आहे, हे स्पष्ट आहे.