गोवा : कळंगुट पोलिसांची अनधिकृत दलालांवर कारवाई
८० सहस्र रुपये दंड वसूल
म्हापसा, १२ ऑक्टोबर (वार्ता.) : कळंगुट पोलिसांनी पर्यटकांना अनधिकृतपणे ‘मसाज’ सेवा देणे किंवा अन्य गैरव्यवहारात गुंतवणे या प्रकरणी १६ दलालांना कह्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट केले आहेत. या दलालांना पुढे पर्यटक संचालकांसमोर उपस्थित करून त्यांच्याकडून एकूण ८० सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला. (अनेक वेळा अनधिकृत दलालांवर कारवाई होऊनही हे प्रकार का थांबत नाहीत, याचा प्रशासनाने शोध घ्यावा ! पकडलेले दलाल दंड भरून सुटका झाल्यानंतर पुन्हा तोच प्रकार करत असावेत. यामुळे त्यांना धाक बसेल अशी शिक्षा केली पाहिजे ! – संपादक) दलाल पर्यटकांची लुबाडणूक करत असल्याच्या वाढत्या तक्रारी आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.