नवी मुंबईत ६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई !
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे नवनियुक्त उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी सानपाडा आणि तुर्भे विभागातील ६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ‘अशी अनधिकृत बांधकामे यापुढे खपवून घेणार नाही’, अशी त्यांनी चेतावणी दिली. या कारवाईत दीड लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.