टोलवसुली थांबवण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !
१३ ऑक्टोबर याविषयी धोरण निश्चितीसाठी बैठक !
मुंबई – राज्यातील टोलवसुलीच्या प्रश्नाविषयी १२ ऑक्टोबर या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना राज ठाकरे यांनी टोलवसुलीच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. टोलवसुलीविषयी धोरण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर या दिवशी माझ्या निवासस्थानी बैठक होणार असल्याचे सांगितले.