इस्रायलमध्ये स्थापन करण्यात आले ‘एकता सरकार’ !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायल सरकारने हमासविरुद्ध चालू असलेल्या युद्धावर लक्ष ठेवण्यासाठी ‘एकता सरकार’ (युनिटी गव्हर्नमेंट) आणि ‘युद्ध मंत्रीमंडळ’ यांची स्थापना केली. या नव्या सरकारमध्ये विरोधी पक्षांचाही समावेश करण्यात आला आहे. वर्ष १९७३ नंतर प्रथमच असे घडले आहे. ‘एकता सरकार’ म्हणजे सर्व पक्षांचा समावेश असलेले सरकार. हे युद्धाच्या वेळी स्थापन केले जाते. यात पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि संरक्षणमंत्री यांचा समावेश असतो.
सौजन्य विऑन
भारत इस्रायलमधील सर्व १८ सहस्र भारतियांना मायदेशी आणणार !
इस्रायलमध्ये अडकलेल्या १८ सहस्र भारतियांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ ही मोहीम राबवण्याची घोषणा केली. त्यासाठी पहिले विमान १२ ऑक्टोबरला मार्गस्थ झाले. भारतीय नौदलही साहाय्यासाठी सज्ज असणार आहे. या संदर्भात परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर म्हणाले की, भारत सरकार ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत भारतियांना परत आणेल. ज्यांना परत यायचे, असेल ते येऊ शकतात. इस्रायलमधील भारतीय राजदूत म्हणाले की, पहिल्या विमानातून भारतात येण्यासाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांची माहिती ई-मेलवर पाठवण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या इतर प्रवाशांची माहिती पुढील विमानसेवेच्या वेळी पाठवली जाईल.