Pejawar Swamiji : अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात ! – पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी
उडुपी (कर्नाटक) – प्रभु श्रीराम हे आमच्यासाठी आदर्श असल्यामुळे सहस्रो वर्षे झाली, तरी आम्ही श्रीरामांची आराधना करत त्यांच्या आदर्शांचे पालन करत आलो आहोत; परंतु हे अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात. त्याचे लहानसे उदाहरणच शिवमोग्गा येथील दंगल आहे, असे विधान पेजावर मठाचे स्वामी विश्वप्रसन्न तीर्थ यांनी येथे केले. काही दिवसांपूर्वी शिवमोग्गा येथे ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्याविषयी स्वामीजी येथील एम्.जी.एम्. या मैदानावर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदु समाजोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
पेजावर स्वामीजी पुढे म्हणाले की, शिवमोग्गा येथील दंगलीमध्ये किती दुकाने, घरे यांच्यावर दगडफेक झाली ? किती वाहनांना, प्रार्थनास्थळांना आग लावण्यात आली ? आम्ही हिंदु शांतता प्रिय आहोत. आमच्या धर्माचे प्रतीक श्रीरामचंद्र आहेत. तेच आम्हाला आदर्श आहेत. या देशाचा कण आणि कण पवित्र आहे. माता स्वर्गापेक्षा महान आहे. आम्ही दगडफेक करणारे, डोके फोडणारे नाही. चांगल्या विचारांसाठी आमचे हृदयमंदिर सदैव उघडे असते.