पुण्यातील नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेसह विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद
शाळकरी मुलाला त्रास दिल्याचे प्रकरण !
पुणे – शहरातील एका नामांकित शाळेत पहिलीत शिकत असलेल्या मुलाला पुढच्या वर्गातील एक विद्यार्थी आणि त्याचा पहिलीतील मित्र त्रास देत होता, तसेच त्याला चुकीचा पद्धतीने स्पर्श करत होता. ‘या प्रकाराची माहिती कुणाला दिल्यास तुला मारहाण करू’, अशी धमकी विद्यार्थ्यांनी मुलाला दिली होती. याची माहिती पालकांना समजल्यावर त्यांनी मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली होती. तक्रार केल्यानंतरही मुख्याध्यापिकेने योग्य ती कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणी एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर शाळेतील विद्यार्थी आणि मुख्याध्यापिका यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (तक्रार करूनही त्याची नोंद न घेणार्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा मुख्याध्यापिकांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकाशिक्षणाचे माहेरघर असणार्या पुण्यामध्ये मुख्याध्यापिका आणि विद्यार्थी यांच्यावर गुन्हा नोंद करावा लागणे, हे दुर्दैवी आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी शाळांमधून धर्मशिक्षण देणे आवश्यक ! |