गोवा : उसप, डिचोली येथे मंदिरात चोरी
गोव्यातील असुरक्षित मंदिरे !
डिचोली, ११ ऑक्टोबर (वार्ता.) : अज्ञातांनी भटवाडी, उसप, डिचोली येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात चोरी करून आतील दानपेटी पळवली. काही दिवसांपूर्वी ही चोरीची घटना उघडकीस आली. मंदिराचे पुजारी सकाळी मंदिरात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर देवस्थान समिती आणि पोलीस यांना याविषयी माहिती देण्यात आली. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये घटनास्थळी दिली. त्यांनी मंदिरात ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्याचे आश्वासन दिले आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून आतील रक्कम काढून पेटी मंदिराच्या जवळ टाकून दिली होती.
डिचोली परिसरात चोरीचे वाढते प्रकार !
लाडफे, डिचोली येथे २१ मे या दिवशी श्री महादेव मंदिरात आणि २४ मे या दिवशी कासरपाल येथील श्री सातेरी भूमिका मंदिरात चोर्या झाल्या होत्या. काही मासांपूर्वी डिचोली येथील एका पेट्रोल पंपावरही चोरी झाली होती. डिचोली परिसरात चोरट्यांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.