पुणे येथे बनावट आस्थापन स्थापन करून गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक !
पुणे – बनावट आस्थापन स्थापन करून गुंतवणुकीच्या आमिषाने राज्यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी विनोद खुंटे, संतोष खुंटे, मंगेश खुंटे, किरण अनारसे आणि अजिंक्य बडवे यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘ईडी’ने) कात्रज भागातील आंबेगाव ब्रुदूक परिसरातील आस्थापनाच्या कार्यालयावर धाड घातली आहे. आरोपींनी ‘आय.पी.एस्. ग्रुप ऑफ कंपनी’ आणि ‘ग्लोबल अॅफिलेट कंपनी’ अशी आस्थापने स्थापन केली. या आस्थापनांमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे आमीष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते.
संपादकीय भूमिकास्वार्थासाठी कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारी पिढी सिद्ध होणे, हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! |