सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त रथाची सेवा करतांना आणि त्यानंतर श्री. रामदास कोकाटे यांना आलेल्या अनुभूती
१. रथाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. रथाच्या सिद्धतेची सेवा करतांना सलग ३ – ४ दिवस जागरण होऊनही झोपेचा त्रास न होता सेवेतील आनंद घेता येणे : ‘११.५.२०२३ या दिवशी होणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षींच्या आज्ञेनुसार गुरुदेव रथात बसणार होते. ‘विविध ठिकाणांहून आलेल्या सर्व साधकांना गुरुदेवांचे दर्शन व्हावे, यासाठी रथ मैदानावर सर्वत्र फिरवण्यात येणार होता. मैदानात रथ फिरवण्याच्या सिद्धतेची सलग ३ – ४ दिवस सेवा चालू होती. त्यासाठी जागरण करत असतांना माझ्या मनावर कुठलाही ताण नव्हता, तसेच मला झोपेचाही त्रास कधी झाला नाही. गुरुदेवांच्या कृपेने मला सेवेतील आनंद घेता आला.
२. रथोत्सवाच्या दिवशी आलेल्या अनुभूती
२ अ. रथोत्सवाच्या वेळी श्री गुरुदेव बसलेल्या रथाच्या पाठीमागून चालत असतांना माझे पूर्ण शरीर हलके होऊन मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते.
२ आ. रथोत्सवानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणांहून उत्सवस्थळी आलेल्या साधकांकडे पाहिल्यावर गुरूंच्या समष्टी रूपाची जाणीव होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते.
२ इ. माझ्या डोळ्यांसमोर गुरुदेवांचे रूप पुनःपुन्हा येत होते.
२ ई. गुरुदेव कृपाकटाक्ष टाकत असतांना आतून थंडावा वाटून पुष्कळ आनंद होणे : रथोत्सवानंतर रथ सिद्ध करण्याची सेवा करणार्या आम्हा साधकांची गुरुदेव आणि उपस्थित साधक यांना ओळख करून देण्यात येणार होती. त्यासाठी आम्हाला व्यासपिठावर बोलवण्यात आले. व्यासपिठाच्या समोर रथात गुरुदेव बसले होते. त्या वेळी गुरुदेवांना नमस्कार करतांना माझे देहभान हरपले. गुरुदेव आम्हा साधकांवर कृपाकटाक्ष टाकत असतांना मला आतून थंडावा वाटून पुष्कळ आनंद होत होता.
गुरुदेवांनीच ही सेवा आमच्याकडून करवून घेतली आणि त्यांच्या कृपेनेच ती पूर्ण झाली. ‘गुरुदेव अशा लहान सेवांतूनही साधकांना आनंद देतात’, हे मला यातून शिकायला मिळाले.
– श्री. रामदास कोकाटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.५.२०२३)