जळगाव येथे लव्ह जिहादच्या प्रकरणी दानिश तडवी याला अटक
लव्ह जिहादच्या कायद्याची आवश्यकता लक्षात घ्या !
जळगाव – दानिश तडवी या १९ वर्षीय धर्मांधाने वर्ष २०२१ पासून एका हिंदु मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर अत्याचार केले आणि तिचा लैंगिक छळ केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
हिंदु युवतीची अश्लील छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार महाविद्यालयातून बोलावून घेऊन तिच्याशी अश्लील चाळे करत असे, तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचारही करत असे. महाविद्यालयातून येण्यास तिने नकार दिल्यावर तिला छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत असे. ३ वर्षे त्या युवतीने छायाचित्रे प्रसारित होऊन अपकीर्ती होण्याच्या भीतीपोटी हा छळ सहन केला. अंतिमतः मनाने पूर्ण खचल्यावर तिने याविषयी घरी सांगितले. घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी दानिश याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करून कारवाई केली.
शाळेपासून त्यांची ओळख होती. युवती महाविद्यालयात गेल्यावर तेथे तिला तो भेटण्यास जाऊ लागला. शहरातील धरणावर फिरायला घेऊन जाऊन तिथे अश्लील वर्तन करत तिची छायाचित्रे काढली होती, तसेच मेहरूण तलावाच्या झुडपात नेऊन तिथेही तिच्यावर अत्याचार करून तिची छायाचित्रे काढली होती. (हिंदु मुलींनी कोणत्याही धर्मांध मुलाशी मैत्री करू नये, हे दर्शवणारी घटना ! – संपादक)