शरीर व्याधीने ग्रासले असले, तरी ते ध्यान, उपासना आणि आराधना यांच्या आड येत नाही !
‘वाढदिवस वास्तविक मृत्यूच्या जवळ जाण्याचा दिवस आहे. दुःखातून ज्याला मुक्त व्हायचे आहे, व्याधीतून ज्याला सुटायचे आहे, त्याला शरिरापासून सुटले पाहिजे. शरिरापासून स्वतःचे वेगळेपण जाणून घेणे, म्हणजे शरिरापासून मुक्ती ! साक्षित्व हीच शरिरातून मुक्ती ! शरीर स्वस्थ असो वा नसो, साधक शरिराचा सन्मान (कदरच) करत नाही. शरीर व्याधीने ग्रासले असले, तरी ते ध्यान, उपासना किंवा आराधना यांच्या आड येत नाही. साक्षित्व किंवा धारणा यांच्या आड येत नाही. वास्तविक शरीर स्वस्थ नसतेच. ‘ते स्वस्थ आहे’, असे वाटते; पण ते स्वास्थ्य पहाता पहाता निघून जाते. कसली व्याधी नाही, वेदना नाही, असे शरीर असूच शकत नाही. सदासर्वदा पूर्ण आरोग्य, पूर्ण निरोगी शरीर असूच शकत नाही.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २०२३)