नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने १५ ते २३ ऑक्टोबर कुंकूमार्चन महाचंडी यज्ञ !
कोल्हापूर – मिरजकर तिकटी येथे असलेल्या श्री एकमुखी दत्त देवस्थान येथे गेली ८ वर्षे शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत कुंकूमार्चन महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत महिलांसाठी विनामूल्य कुंकूमार्चन धार्मिक पूजा विधानाचे आयोजित केले आहे. या विधानाला विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती धर्मशास्त्राचे अभ्यासक येणार आहेत, अशी माहिती श्री एकमुखी दत्त देवस्थानचे श्री. संतोष गोसावी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, सेवाव्रत प्रतिष्ठानचे श्री. संभाजी साळुंखे यांसह अन्य उपस्थित होते.
या संदर्भात श्री. संतोष गोसावी महाराज म्हणाले, ‘‘या महापुण्य सोहळ्यात १ लाख दुर्गा सप्तशती पाठवाचन, भागवत कथा वाचन, तसेच देवीच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक होणार आहे. या निमित्ताने होणार्या महाप्रसादासाठी गहू, तांदूळ, तूप, शिधा, तसेच अन्य देणगी स्वीकारली जाईल. कुंकूमार्चन, पंचामृत अभिषेक, तसेच कुमारिका पूजन आणि ज्यांना देवीला नैवेद्य द्यायचा आहे, त्यांनी त्यांची नावे नोंद करावीत.’’