शंखवाळ (गोवा) येथे वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करणार्यांवर कारवाई करण्याची देवीच्या भक्तांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वास्को : शंखवाळ (सांकवाळ) येथ ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार म्हणजेच श्री विजयादुर्गादेवीचे पुरातन मंदिर असलेले ठिकाण) या वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या प्रकरणी फादर केनीत टेलीस आणि इतर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देवीच्या भक्तांनी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
वारसा स्थळी स्थापन केलेली श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती १८ ऑगस्ट २०२३ या दिवशी चोरण्यात आली. या घटनेनंतर फादर केनित टेलीस आणि इतर यांनी वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करून एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी धार्मिक तणाव निर्माण करणारी भाषणे देण्यात आली. पोलिसांनी वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केल्याच्या प्रकरणी दोघांवर कारवाई आरंभली आहे; मात्र दुसर्या गटावर कोणतीच कारवाई केलेली नाही.