सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे लाचार ?
सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ९ दिवस, ११ दिवस, २१ दिवस गणेशोत्सव साजरा करतात. मंडळांचा आढावा घेतला, तर कार्याच्या फलनिष्पत्तीऐवजी लाचारीच आढळते. सध्या गणेशोत्सव साजरा करण्यात भरपूर पैसा खर्च करतात. गणपतीची अवाढव्य मूर्ती आणि देखावा करतात. विजेची रोषणाई, गर्दी खेचून घेण्यासाठी ‘ऑर्केस्ट्रा’ इत्यादी असते. सर्वसाधारणपणे कार्यकारी समितीचा ‘वरची कमाई’ करण्याकडे कल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘वरील खर्च’ दुकानदार, व्यापारी, हितचिंतक यांच्याकडून गोळा केला जातो. खर्च भागत नाही; म्हणून ‘देणगी कूपन’ छापून त्याची लॉटरी तिकिटाप्रमाणे विक्री करतात. ही ‘देणगी कूपन’ छापून विक्री करण्याचे दायित्वही मंडळाचे कार्यकर्ते घेत नाहीत. ती विक्री करण्याचे कंत्राट दुसर्यांना देतात. आणखी कमाल म्हणजे चांगला हिंदु कंत्राटदार मिळत नाही; म्हणून अहिंदूंना कंत्राटे देतात. प्रतिवर्षी अहिंदू हानी सोसूनही कंत्राट का घेतात ? याचा मंडळाचा अभ्यास नसतो.
गोव्यात तर फोंडा, मडगाव, सांगे भागात प्रतिवर्षी देणगी कूपन विकण्याचे कंत्राट मुसलमान घेतात. कूपनची विक्री करण्यास चांगली दिसणारी तरुण मंडळी बसतात, असे लक्षात आले. याद्वारे त्यांना लव्ह जिहाद प्रकरण करण्यास सोपे झाले. एकप्रकारे त्यांना प्रोत्साहनच मिळते. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे हिंदूंचे संघटन देशहितासाठी करणे आणि तरुणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, असा टिळकांचा उद्देश होता. सध्याच्या गणेशोत्सव मंडळांचा उद्देश असा मुळीच आढळत नाही. मंडळांच्या अयोग्य कृतींमुळे हिंदूचे संघटन बाजूला राहून अहिंदूचे संघटन आणि हिंदु धर्मावर आघात होतांना लक्षात येते.
खरेतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच उत्सवाची सर्व व्यवस्था करायची असते. सर्व सभासदांनी एकमेकांचे साहाय्य घेऊन मनापासून सेवा करायची असते. लहान-मोठ्या व्यवस्थांचे कंत्राट दिल्यामुळे सहाजिकच खर्च वाढतो. त्यामुळे संघटितपणा आणि सेवाभाव वाढीस लागत नाही. यासाठी गणेशोत्सव मंडळाचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. पुढच्या वर्षीच्या दृष्टीने आतापासूनच त्याचा विचार करणे आवश्यक नाही का ?
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.