नेपाळमधील दंगली ! 

पाळमध्‍ये झालेल्‍या हिंदु-मुसलमान दंगलीला भारतीय उत्तरदायी आहेत,  भारतातून आलेले लोक दंगली करत आहेत, असे विधान तेथील मुसलमानांच्‍या एका नेत्‍याने १० ऑक्‍टोबर या दिवशी केले आहे. नेपाळमध्‍ये या वर्षात हिंदु-मुसलमान दंगलीच्‍या ५ घटना झाल्‍या आहेत. काही दिवसांपूर्वी नेपाळमधील सीमाभागात लागू केलेली संचारबंदी आणि मागील आठवड्यात झालेल्‍या दंगली या पार्श्‍वभूमीवरचे हे विधान आहे. १ आणि ३ ऑक्‍टोबरला मुसलमानांनी नेपाळमधील नेपालगंजमध्‍ये दंगल केली. १ ऑक्‍टोबरला ५ सहस्र मुसलमानांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या कार्यालयात मुसलमानांचा झेंडा उभा केला. मुसलमानांनी परत येतांना वाटेतील अनेक गाड्यांना आग लावली आणि हिंदूंविषयी अतिशय अभद्र भाषा वापरली. याचा परिणाम म्‍हणून ३ ऑक्‍टोबरला हिंदूंनी ‘शांती यात्रा’ काढली. ती मुसलमानबहुल भागातून जात असतांना तिच्‍यावर दगडफेक करण्‍यात आली, तसेच पेट्रोल बाँब फेकण्‍यात आले. त्‍यात ६ पोलीस आणि १७ लोक घायाळ झाले, तसेच एका हिंदु युवकाचा मृत्‍यू झाला. त्‍यानंतर धर्मगुरूंची बैठक बोलावणे आणि संचारबंदी करणे, या सोपस्‍कारांच्‍या व्‍यतिरिक्‍त तेथील पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. एका हिंदूने सामाजिक माध्‍यमातून मुसलमानावर कथित टिपणी केल्‍यावरून मुसलमानांनी या दंगली केल्‍या. गेल्‍या ८ सप्‍टेंबरला श्रीकृष्‍णाची मिरवणूक मुसलमानबहुल परिसरातून जातांनाही मोठी दंगल झाली. त्‍या वेळीही दगडफेक करण्‍यासह धार्मिक स्‍थळांना आगी लावल्‍या. २१ सप्‍टेंबरला श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्‍या मिरवणुकीवरून परत मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्‍या आक्रमणात २ सशस्‍त्र सैनिकही घायाळ झाले. प्रत्‍येक वेळी दंगल झाली की, त्‍या त्‍या भागात संचारबंदी लागू करण्‍यात येते; पण मुसलमानांवर कारवाई झाल्‍याची वृत्ते मात्र येत नाहीत. ‘ज्‍याला हिंदु-मुसलमान दंगल म्‍हटले जात आहे, ती प्रत्‍यक्षात पोलीस प्रशासन आणि मुसलमान यांच्‍यातील बाचाबाची आहे’, असे तेथील प्रशासन म्‍हणते. थोडक्‍यात तेथील पोलिसांच्‍या दृष्‍टीने या दंगलींना फारसे काही महत्त्व नाही. नेपाळ काँग्रेस आणि साम्‍यवादी यांची युती असलेल्‍या पंतप्रधान प्रचंड दहल यांच्‍या सरकारचाही हा परिणाम आहे. तेथील पोलीस, प्रसारमाध्‍यमे, प्रशासन आदी कुणीही या दंगलींना फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. आगामी काळात हा संघर्ष वाढू शकतो.

भारताची हानी

भारत-नेपाळ सीमा १ सहस्र ७५१ कि.मी. आहे. उत्तरप्रदेश राज्‍याशी जोडलेली सीमा सर्वांत अधिक आणि अल्‍प प्रमाणात ती बंगालशी जोडलेली आहे. उत्तराखंड आणि सिक्‍कीम ही राज्‍येही नेपाळच्‍या सीमेला जोडलेली आहेत. ‘नेपाळमधील हिंदूंनी मुसलमानांच्‍या दबावाखाली रहाणे आणि भारताप्रमाणेच मुसलमानांनी नेपाळमध्‍येही दंगली करून हिंदूंचे जिणे नकोसे करणे’, असे चालू आहे; परंतु केवळ नेपाळमधील हिंदूंवरच नाही, तर नेपाळला लागून असलेल्‍या भारतातील जिल्‍ह्यांमध्‍येही त्‍याचा परिणाम दिसून येतो. नेपाळमधील दंगलींचा परिणाम उत्तरप्रदेशमधील बहराईच या जिल्‍ह्याला अधिक भोगावा लागत आहे. जेव्‍हा जेव्‍हा नेपाळमध्‍ये हिंदु-मुसलमान दंगल होते, तेव्‍हा सुरक्षेच्‍या कारणावरून दोन्‍ही देशांतील सीमा बंद केल्‍या जातात. त्‍यामुळे दोन्‍हीकडे वाहतुकीच्‍या मोठ्या रांगा लागून समस्‍या निर्माण होतात. विशेषतः ट्रक वाहतूकदारांची मोठी हानी होते. नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये निवडणुकांसाठी भारत-नेपाळ सीमा ३ दिवस बंद करण्‍यात आली होती. त्‍यामुळे ‘कोट्यवधी रुपयांची हानी झाली’, असे सांगण्‍यात येते.

भारत-नेपाळ सीमेवर धोकादायक स्‍थळे

भारत-नेपाळ सीमेवर गेल्‍या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्‍या संख्‍येत तब्‍बल ४ पटींनी वाढ झाली आहे. जानेवारी २०२३ मध्‍ये उत्तरप्रदेश सरकारने नेपाळ सीमेनजीक असलेल्‍या उत्तरप्रदेशातील मदरशांची चौकशी आणि अभ्‍यास केला. उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर येथे ५४२ पैकी १४२ मदरसे अवैध निघाले. या मदरशांना दुबई आणि आखाती देश येथून पैसे मिळत असल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला गेला. मदरशांमधून आतंकवादी, बलात्‍कारी आदी गुन्‍हेगारी कारवाया करणारे निपजत असतांना भारतात कुणालाही मदरसा उघडण्‍याची अनुमती आहे. नेपाळच्‍या सीमेवरील जिल्‍ह्यांमध्‍ये मुसलमानांच्‍या लोकसंख्‍येत अडीच पटींनी वाढ झाली आहे, तसेच गेल्‍या २ वर्षांत येथे ४०० मशिदी आणि मदरसे बांधण्‍यात आले आहेत. सीमेवरील राज्‍ये मुसलमानबहुल करून, म्‍हणजेच पंथनिहाय लोकसंख्‍येचा समतोल बिघडवून ती भारतापासून तोडण्‍याचे हे मोठे षड्‍यंत्र चालू आहेे. ‘जमात उल् मुजाहिदीन बांगलादेश (जे.एम्.बी.)’ ही आतंकवादी संघटना येथे कार्यरत असून ती भारतात घुसखोरी करते’, असे २ वर्षांपूर्वी उघड झाले होते. भारतातील काही राज्‍यांमध्‍ये सुनियोजित पद्धतीने पाकिस्‍तानला जोडणारा ‘सुसज्‍ज महामार्ग’ धर्मांधांकडून निर्माण करण्‍यात येत आहे. या माध्‍यमातून फाळणी करण्‍याचे षड्‌यंत्रही उघड झाले आहे. हे लक्षात घेऊन ‘भारताच्‍या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण कसा होणार नाही’, याची दक्षता घेणे अत्‍यावश्‍यक झाले आहे. एकदा का परिसर मुसलमानबहुल झाला की, दंगलींसह सर्व प्रकारचे जिहाद आणि तेथून ‘हिंदूंचे विस्‍थापन’ हा घटनाक्रम आता सर्वांना पाठ झाला आहे. (सीमेनजीकचे जिल्‍हे मुसलमानबहुल झाल्‍याने तिथे तस्‍करीचे गुन्‍हेही २५ टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.) हीच कल्‍पना मुसलमान सर्वत्र राबवत आहेत; पण नेपाळसह भारतातील हिंदू अपेक्षित तेवढे जागरूक नसल्‍यामुळेच मुसलमानबहुल वस्‍त्‍यांविषयी त्‍यांच्‍याकडून ठोस कृती होत नाही. विशेषतः या वस्‍त्‍या जेव्‍हा २ देशांच्‍या सीमेनजीक होतात, तेव्‍हा त्‍यांतील गुंतागुंत आणि धोका अधिक वाढतो. नेपाळ आणि भारत या दोन्‍ही हिंदूबहुल देशांवर असे छुपे आक्रमण चालू ठेवणे, हे जिहाद्यांना बरे पडते. या सर्वांचाच एक भाग म्‍हणजे नेपाळमध्‍ये होत असलेल्‍या सध्‍याच्‍या दंगली या आहेत. असे असूनही तेथील मुसलमान नेते भारतियांवर आरोप करत आहेत. भारत सरकार याकडे गांभीर्याने पहात असेल, अशी अपेक्षा आहे !

नेपाळ-भारत यांच्‍या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्‍याचा गंभीर परिणाम म्‍हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !