शेतकर्यांच्या खात्यात ६ सहस्र रुपये जमा होणार !
मुंबई – ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या अंतर्गत १ सहस्र ७२० कोटी रुपये इतका निधी वितरणासाठी राज्यशासनाने मान्यता दिली आहे. केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेद्वारे प्रतिवर्षी प्रत्येक शेतकर्याला ६ सहस्र रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी ६ सहस्र रुपये देण्याची ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित केली होती.