ठाण्यात ३ सहस्र ९२ प्रवासी विनातिकीट !
ठाणे – ठाणे रेल्वेस्थानकात ९ ऑक्टोबर या दिवशी ३ सहस्र ९२ प्रवासी विनातिकीट आढळले. त्यांच्याकडून ८ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत १२० तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा दलाचे ३० जवान असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.