सातारा येथे जुगार अड्ड्यावर कारवाई !
सातारा, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – सातारा बसस्थानकापासून जवळच असलेल्या राधिका रस्त्यावर जुगार चालू असल्याची माहिती मिळताच पोलीस जुगार अड्ड्यावर गेले. या वेळी जुगार खेळणार्या २५ ते ३० जणांना पोलिसांनी पकडले; मात्र काही जण पळून गेले. सातारा शहर पोलिसांनी ही कारवाई केली.