पुणे येथे ‘इंस्टाग्राम’वर हिंदु देवतांविषयी अश्लील लिखाण केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा नोंद !
पुणे – हिंदु देवता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘इंस्टाग्राम’वर अश्लील भाषेत लिखाण केले आहे. या प्रकरणी सागर सावंत याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ६ ऑक्टोबर या दिवशी केलेल्या लिखाणाविषयी रवींद्र पडवळ यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
आरोपी सागर सावंत याने तक्रारदाराच्या मित्राच्या ‘इंस्टाग्राम’वरील ‘पोस्ट’वर आपले मत मांडतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच हिंदु देवतांविषयी अश्लील विधान केले. आरोपीने हिंदूंंच्या धार्मिक भावनांचा अपमान करून बघून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदु सहिष्णु असल्यामुळे वारंवार हिंदु देवतांचा अपमान केला जातो. हे चित्र पालटण्यासाठी हिंदूंनी देवतांचे विडंबन करणार्यांना शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करावा ! |