‘हमास’चे संकेतस्थळ हॅक आणि सायबर यंत्रणा हॅकर्सकडून नष्ट !
नवी देहली – हमासने इस्रायलवर आक्रमण केल्यानंतर तिचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले आहे. हमासची संपूर्ण सायबर यंत्रणा यात नष्ट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यामुळे हमासची मोठी हानी झाली आहे. यामागे भारत असल्याचा आरोप करत हमासच्या हॅकर्सच्या गटांनी भारताच्या अनेक संकेतस्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ‘भारताचा सूड घेऊ’, अशी धमकीही त्यांनी दिली आहे. सिलहट, गार्नेशिया, पॅनोक आणि गॅनोसेक या गटांनी ही धमकी दिली आहे. या गटांनी भारतच नाही, तर अमेरिका, फ्रान्स, युक्रेन आदी देशांनाही सायबर आक्रमणाची धमकी दिली आहे. या हॅकर्स गटांचे म्हणणे आहे की, भारताने इस्रायलला साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.