अमली पदार्थ तस्करीप्रकरणी पोलीस हवालदार अटकेत !
|
मुंबई – येथील आर्थर रोड कारागृहातील पोलीस हवालदार विवेक नाईक यांना अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नाईक हे कारागृहातील बंदीवानांना अमली पदार्थ पुरवत असत. (अशांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक) वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ७० ग्रॅम चरस कह्यात घेण्यात आले. पोलिसांनी विवेक नाईक यांच्या विरोधात ‘एन्.डी.पी.एस्.’ (‘नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस’) कायद्यानुसार गुन्हा नोंद केला असून त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांनी तस्करी करणे म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्याचा’ प्रकार ! |