शांत, अभ्‍यासू स्‍वभाव आणि गुरुकार्याची पुष्‍कळ तळमळ असलेले कोल्‍हापूर सेवाकेंद्रात रहाणारे श्री. संतोष रामकृष्‍ण गावडे (वय ४३ वर्षे) !

‘४.१०.२०२३ (भाद्रपद कृष्‍ण षष्‍ठी) या दिवशी श्री. संतोष रामकृष्‍ण गावडे यांचा ४३ वा वाढदिवस झाला. संतोषदादांचे मूळ गाव शिरोडा, वेंगुर्ला (जिल्‍हा सिंधुदुर्ग) हे आहे. त्‍यांचे थोरले भाऊ, बहीण, पत्नी आणि आई-वडील यांचा सनातनच्‍या सेवेत सहभाग आहे.

श्री. संतोष रामकृष्‍ण गावडे

१. ग्रंथछपाईची सेवा झोकून देऊन करणे

संतोषदादा सेवेच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर येथे रहात असून ते सनातनच्‍या ग्रंथांच्‍या छपाईची सेवा करतात. ते नवीन नवीन सेवाही शिकत आहेत. दादांचा स्‍वभाव शांत, अभ्‍यासू, काटकसरी आणि कष्‍टाळू आहे. त्‍यांना गुरुकार्याची पुष्‍कळ तळमळ असून त्‍यांनी ग्रंथछपाईच्‍या कार्याची चांगली घडी बसवली आहे. दादा समर्थपणे आणि झोकून देऊन सेवेचे दायित्‍व पार पाडत आहेत.

श्री. राजेंद्र सांभारे

२. प्रेमळ स्‍वभावाने समाजातील व्‍यावसायिकांना आपलेसे करणे 

दादा सर्वांना आपलेसे करून घेतात. त्‍यांनी आपल्‍या प्रेमळ स्‍वभावाने कोल्‍हापूर येथील कागदविक्रेते, तसेच ग्रंथछपाईच्‍या कार्याशी संबंधित व्‍यावसायिक यांना जोडून ठेवले आहे.

३. चुकांविरहित सेवा होण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करणे 

सेवेत येणार्‍या प्रत्‍येक अडचणीवर दादांनी उपाययोजना काढली आहे. ते अन्‍य साधकांचे साहाय्‍य घेऊन ग्रंथांची तपासणी, मोजणी, तसेच बांधणी (‘पॅकिंग’) करणे, या सेवा चुकांविरहित होण्‍यासाठी प्रयत्न करतात. कितीही सेवा करावी लागली, तरी दादा ती उत्‍साहाने आणि तळमळीने करतात. व्‍यवस्‍थितपणा, सचोटीने वागणे आणि गोड बोलणे यांमुळे दादा सर्वांना जवळचे वाटतात.

सनातनच्‍या ज्ञानशक्‍ती प्रदान करणार्‍या ग्रंथछपाईच्‍या कार्यात ते योगदानरूपी पुष्‍प अर्पण करत आहेत. या सेवेमुळे दादांमधील दैवी गुणांमध्‍ये वाढ झाली आहे. ‘त्‍यांची लवकर आध्‍यात्‍मिक प्रगती होऊ दे आणि जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून सुटका होऊ दे’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो.’

– श्री. राजेंद्र नारायण सांभारे (आध्‍यात्‍मिक पातळी ६० टक्‍के, वय ६५ वर्षे), देवद, पनवेल. (१०.४.२०२३)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक