असे पू. गडकरीकाका आहेत प्रिय फार । कारण प्रीती आहे त्यांच्यात अपार ॥
‘निज श्रावण शुक्ल चतुर्थी (२०.८.२०२३) या दिवशी सनातनचे १९ वे (समष्टी) संत पू. रमेश गडकरी यांचा ६५ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी पू. रमेश गडकरी यांच्यासाठी केलेली कविता येथे दिली आहे.
आनंद मूर्ती अन् सुहास्य वदन ।
मूर्ती लहान; पण कीर्ती महान ॥ १ ॥
काळानुसार क्षात्रवृत्ती आहे त्यांच्यात फार ।
म्हणूनी साधनेतील ‘गड’करती भरभर ‘सर’ ॥ २ ॥
व्यष्टी साधना केली अज्ञातवासात ।
समष्टी साधना चालू आहे सात्त्विक उत्पादनांच्या सेवेत ॥ ३ ॥
साधक झाले वृद्ध, वाढ कशी होईल उत्पादनात ।
यांत्रिकीकरण करून सत्वर केली त्यावर मात ॥ ४ ॥
भगवंताचे चैतन्य कसे पसरेल हो सर्व जनांत ।
याच तळमळीने नवनवीन कल्पना सुचतात ॥ ५ ॥
असे पू. गडकरीकाका आहेत प्रिय फार ।
कारण प्रीती आहे त्यांच्यात अपार ॥ ६ ॥
– (सद़्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.८.२०२३)