मुंबईत ‘झोमॅटो’द्वारे खाद्यपदार्थ पुरवणार्‍यांचा संप !

(‘झोमॅटो’ या अ‍ॅपद्वारे खाद्यपदार्थांची मागणी घेऊन ते पुरवणारे आस्‍थापन)

मुंबई – झोमॅटोद्वारे खाद्यपदार्थ पुरवणार्‍यांनी त्‍यांच्‍या विविध मागण्‍यांसाठी ९ ऑक्‍टोबरपासून संप पुकारला आहे. ‘जोपर्यंत मागण्‍या मान्‍य होत नाहीत, तोपर्यंत संप चालूच राहील’, अशी चेतावणी त्‍यांनी दिली आहे. शिवसेनेने या संपाला पाठिंबा दिला आहे. या संपामुळे ऑनलाईन माध्‍यमांद्वारे खाद्यपदार्थ मागवणार्‍यांची गैरसोय होऊ शकते.

झोमॅटोद्वारे खाद्यपदार्थ पुरवणार्‍यांच्‍या मागण्‍या !

  • खाद्यपदार्थ पुरवणार्‍या संबंधितांना समान मागण्‍या मिळाव्‍यात आणि पैसे वाढवून मिळावेत.
  • ‘पीकअप’ (खाद्यपदार्थ घेण्‍याचे हॉटेल) ३ कि.मी. आणि ‘ड्रॉप’ (खाद्यपदार्थ पोचवण्‍याचे ठिकाण) ७ कि.मी. असावे.
  • रायडरसमवेत (खाद्यपदार्थ दुचाकीवरून नेणारे) त्‍यांच्‍या कुटुंबियांनाही विमा मिळावा.
  • कामावरून कमी केलेल्‍यांना पुन्‍हा कामावर रुजू करावे.