मराठी भाषेतील चित्रपटांना प्रतिसाद न दिल्यास मराठीची अवस्था बिकट होईल ! – अमेय खोपकर, मनसे
मुंबई – नुकताच प्रदर्शित झालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा मराठी चित्रपट पहाण्यासाठी चित्रपटगृहात केवळ ५ जणच होते. मराठीतले रसिक गेले कुठे ? एका उत्कृष्ट कलाकृतीला प्रेक्षक मिळत नसतील, तर कुठे चुकत आहे ? हे असे का होते ? याचा निर्माते आणि प्रेक्षक सर्वांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे. चांगले चित्रपट मराठी भाषेत अल्प प्रमाणात सिद्ध होतात. जर आता त्यांना आपण प्रतिसाद दिला नाही, तर दिवसेंदिवस मराठीची अवस्था आणखी बिकट होईल, असे मत मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ‘फेसबुक’द्वारे व्यक्त केले आहे.
संपादकीय भूमिकासर्वच स्तरांवर होणारी मराठीची गळचेपी दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ! |