राजस्थान सरकार मदरसा बोर्डातील ५ सहस्र ६६२ मुसलमान शिक्षकांना कायम करणार !
विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न !
जयपूर (राजस्थान) – राज्यात लवकरच होणार्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत जनतेवर सुविधांची उधळण करत आहेत. यांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या १० सहस्र ५२८ सरकारी कर्मचार्यांना कायम केले जाणार आहे. यामध्ये ‘राजस्थान मदरसा बोर्डा’मध्ये कार्यरत असलेल्या ५ सहस्र ५६२ लोकांचा समावेश आहे. यासह ‘मनरेगा योजने’च्या अंतर्गत ९ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्यांना कायम करण्यासाठी ४ सहस्र ९६६ नवीन पदे सिद्ध केली जाणार आहेत.
राजस्थान मदरसा बोर्ड के सभी 5562 शिक्षा अनुदेशक होंगे नियमित। अशोक गहलोत सरकार का ऐतिहासिक फैसला।
जनता ने जो माँगा, गहलोत सरकार ने दिया !
राजस्थान मदरसा बोर्ड में राजस्थान कांट्रेक्चुअल हायरिंग सिविल पोस्ट रूल्स 2022 के अंतर्गत 9 वर्ष से अधिक अनुभव वाले शिक्षा अनुदेशक, शिक्षा… pic.twitter.com/0GUS7dmZiv
— Congress, Minority Department (@INCMinority) October 6, 2023
संपादकीय भूमिकाहीच आहे का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ? मुसलमानांची तळी उचलणार्या काँग्रेस सरकारला राजस्थानची जनता विसरणार नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे ! |