हमासच्या आक्रमणाचे साम्यवादी आणि कट्टरवादी मुसलमान यांच्याकडून समर्थन !
अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेत्री गौहर खान, सीताराम येचुरी आदींचा समावेश !
जेरुसलेम – जगभरातील साम्यवादी आणि कट्टरवादी मुसलमान हमास या आतंकवादी संघटनेच्या इस्रायलवरील आक्रमणाचे समर्थन करत आहेत. एका महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह फिरवण्यापासून ते निशस्त्र नागरिकांची हत्या आणि अपहरण करण्यापर्यंतच्या अमानुष कृत्ये करणार्या हमासच्या आतंकवाद्यांचे समर्थक करणार्यांमध्ये भारतीय अभिनेत्री स्वरा भास्कर, अमेरिकन-लेबनीज (पॉर्न) अभिनेत्री मिया खलिफा, अभिनेत्री गौहर खान, पाकिस्तानच्या ‘शांतता समिती’ चे अध्यक्ष अहमद हसन बोल्दाक, भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख सीताराम येचुरी आदींचा समावेश आहे.
हमास के इजरायल पर हमले के समर्थन में स्वरा भास्कर और मिया खलीफा जैसे ‘स्टार’ उतर आए हैं। इन्होंने फिलीस्तीन का राग अलापना चालू कर दिया है।https://t.co/ErmmHUNjWr
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 8, 2023
(म्हणे) ‘भारताचीही अशीच अवस्था करू !’ – पाकिस्तानच्या ‘शांतता समिती’च्या अध्यक्षांची धमकीअसे झाल्यास सरकार आणि हिंदू यांची कितपत सिद्धता आहे ?, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानच्या ‘शांतता समिती’ चे अध्यक्ष अहमद हसन बोल्दाक यांनी हमासच्या आक्रमणाचे समर्थन करतांना भारताचीही अशीच अवस्था करू, अशी धमकी दिली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने इन्स्टाग्रामवर एक विधान प्रसारित करून पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. तिने हमासच्या आक्रमणाला विरोध केला नाही. कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख सीताराम येचुरी यांनीही पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे.
|
संपादकीय भूमिकाहिंदूंना उठसूठ हिंसक ठरवणारे पुरोगामी आता हिंसाचाराचे उघड समर्थन करणारे साम्यवादी आणि कट्टरतावादी यांना ‘हिंसक’ म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या ! |