अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांची पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने !
भारतातील मुसलमानांची जिहादी मानसिकता !
अलीगड – हमासने ७ ऑक्टोबर या दिवशी काही मिनिटांत इस्रायलवर ५ सहस्र रॉकेट डागली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवर आक्रमण केले. या पार्श्वभूमीवर अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापिठाच्या आवारात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने केली. या वेळी त्यांनी ‘आम्ही पॅलेस्टाईनच्या समवेत आहोत’, ‘अल्ला हूं अकबर’ (अल्ला हू अकबर) अशा घोषणा दिल्या. (भारतातील मुसलमान हे प्रथम मुसलमान आहेत आणि नंतर भारतीय, हेच ते दर्शवत आहेत ! – संपादक) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला असून इस्रायलचे समर्थन केले आहे.
UP : फिलिस्तीन के समर्थन में उतरे AMU के छात्र, पैदल मार्च निकालकर जमकर की नारेबाजी#AligarhMuslimUniversity | Aligarh Muslim University | #Palestine | #AMU pic.twitter.com/IMKHv9JM1T
— News24 (@news24tvchannel) October 9, 2023
अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधनांना सांगितले की, पॅलेस्टाईनवर अत्याचार केले जात आहेत. पॅलेस्टाईन संकटात आहे. अलीगड मुस्लिम विद्यापिठातील सर्व विद्यार्थी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उभे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमान हे प्रथम मुसलमान असतात आणि नंतर ते एखाद्या देशाचे नागरिक असतात, हेच यातून दिसून येते ! |