‘जवान’ चित्रपट पहाणार्‍या प्रेेक्षकांकडून फटाके फोडून चित्रपटगृहात गोंधळ !

मालेगाव (जिल्‍हा नाशिक) येथे चित्रपटगृहातील प्रकार ! 

हुल्लडबाज तरुण पोलिसांच्‍या कह्यात 

नाशिक – जिल्‍ह्यातील मालेगाव शहरातील ‘कमलदीप’ चित्रपटगृहात अभिनेते शाहरूख खान यांचा ‘जवान’ चित्रपट चालू असतांना शेवटच्‍या दृश्‍याच्‍या वेळी काही प्रेक्षकांनी फटाके फोडले. त्‍या वेळी गोंधळ झाल्‍याने इतर प्रेक्षकांना मनस्‍ताप सहन करावा लागला, तर काही प्रेक्षक घाबरले होते. यानंतर चित्रपटाचे प्रक्षेपण थांबवून पोलिसांना तात्‍काळ बोलावण्‍यात आले. कासिम महंमद इब्राहीम (वय २५ वर्षे) याच्‍याकडे फटाके आढळून आल्‍याने त्‍याच्‍यासह अन्‍य हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या घटनेचे व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाले आहेत.

संपादकीय भूमिका

अभिनेता सलमान खान, शाहरूख खान यांच्‍या चित्रपटाच्‍या वेळी चित्रपटगृहांत तरुणांकडून जाणीवपूर्वक हुल्लडबाजी केली जाते. पोलिसांनी अशा तरुणांवर कठोर कारवाई केल्‍यावरच असे प्रकार थांबतील.