मोखाडा येथे भरदिवसा गळा चिरून विद्यार्थिनीची हत्या !
महाराष्ट्र्रात दिवसाही महिला असुरक्षित !
आरोपी फरार
पालघर – मोखाडा येथे महाविद्यालयामध्ये शिकणार्या एका विद्यार्थिनीची भरदिवसा गळा चिरून प्रभाकर वाघेरे याने हत्या केली. अर्चना वधर असे या मृत मुलीचे नाव आहे. या हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
अर्चना ‘रयत शिक्षण संस्थे’च्या महाविद्यालयामध्ये इयत्ता १२ वीत शिकत होती. ६ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता ती महाविद्यालयामध्ये जात होती. त्या वेळी आरोपी प्रभाकर वाघेरे याने तिला रस्त्यात अडवून तिच्यावर धारदार चाकूने वार केेले. यानंतर त्याने तेथून पळ काढला. या घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी वाघेरे याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली आहेत.