हिंदु धर्म आणि संस्कृती !
‘हिंदु धर्म आणि संस्कृती सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्मसात करून घेते. वास्तविक विषम संस्कृती एकमेकांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांना एकमेकांचा नाश करण्याविना अन्य काही मार्ग सापडत नाही. विषम संस्कृती एकमेकांच्या शेजारी आल्यास त्यांचे सलोख्याचे एकीकरण घडवून आणणे अशक्य आहे. एकमेकांचा नाश करून मग समाज एकरूप करावयाचे, ही पद्धत रानटी आहे. समाज आणि संस्कृती यांचा प्रसार करण्याची हिंदूंची पद्धती अशी रानटी कधीच नव्हती. हिंदूंनी आपल्या संस्कृतीचा प्रसार करतांना कोणत्याही संस्कृतीचा नाश कधीच केला नाही. तशी त्यांना आवश्यकताही वाटली नाही. हिंदूंनी समन्वय आणि समाजविस्तार केला.
हिंदु लोकांच्या समाजशास्त्रात कोणत्याही मानवाचा, कोणत्याही पद्धतीचा, कोणत्याही विचारांचा, कोणत्याही समाजाचा द्वेष नाही. हिंदूंच्या समाजरचनेचे नियम पाळल्यानंतर तत्त्वतः व्यक्तीला कुणाच्याही पंथाचा अनुयायी होण्याची पूर्ण अनुमती होती. आजही तसेच आहे. पीरांची पूजा करणारे हिंदु समाजशास्त्रीय आचार पालटतील, तर अहिंदु होतील; अन्यथा प्राचीन धर्मशास्त्रानुरोधाने ते अहिंदु बनण्याचे कारण नाही. आमची संस्कृती आणि समाजरचना उखडून टाकण्यास टपलेला धर्मांध समाज तर हिंदूंचा कडवा शत्रू. मुसलमानेतरांना म्हणजे काफिरांना मारणे, त्यांना मुसलमान करणे ही कुराणची आज्ञाच !’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०२३)