नागपूर येथील कु. आदिनाथ देशपांडे याचा राष्ट्रीय स्तरावरील पाठांतर स्पर्धेत द्वितीय क्रमांक !
नागपूर – मुंबई येथील अभिनेत्री, लेखिका आणि यूट्यूबर अनुराधा राजाध्यक्ष यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ राष्ट्रीय स्तरावरील ‘मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धे’त सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे (इयत्ता तिसरी)) याने सहभाग घेतला होता. त्यात त्याचा द्वितीय क्रमांक आला. ‘श्री गुरुकृपेनेच हे यश मिळाले’, असे कु. आदिनाथ याने सांगितले. कु. आदिनाथ याने शाळेत जन्माष्टमीला गीतेच्या श्लोकांचे पठणही केले.