‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पडला !

(डावीकडून) अधिवक्‍त्‍या सुवर्णा आव्‍हाड, अधिवक्‍ता भरतजी देशमुख, श्री. विवेक सिन्‍नरकर, डॉ. अमित थढानी

पुणे, ८ ऑक्‍टोबर (वार्ता.) – येथील गरवारे महाविद्यालयाच्‍या जवळील ‘कोहिनूर मंगल कार्यालय’, कर्वे रोड येथे ८ ऑक्‍टोबर या दिवशी डॉ. अमित थढानी यांनी लिहिलेल्‍या ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्‍तकाच्‍या प्रकाशन सोहळ्‍याला ‘महाराष्‍ट्र-गोवा बार कौन्‍सिल’चे माजी अध्‍यक्ष अधिवक्‍ता भरत देशमुख, मुंबई उच्‍च न्‍यायालयातील प्रथितयश फौजदारी अधिवक्‍ता सुवर्णा आव्‍हाड, तसेच ज्‍येष्‍ठ हिंदुत्‍वनिष्‍ठ लेखक आणि ‘गीता विवेक ग्रंथकर्ते’ श्री. विवेक सिन्‍नरकर अन् मुंबईतील सुप्रसिद्ध शल्‍य चिकित्‍सक आणि पुस्‍तकाचे लेखक डॉ. अमित थढानी हे उपस्‍थित होते.

(सविस्‍तर बातमी वाचा लवकरच !)