घाटकोपर येथील गुजराती भाषेतील फलक तोडला !
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची कारवाई !
मुंबई – घाटकोपर (पूर्व) येथील उद्यानात लावण्यात आलेला ‘मारु घाटकोपर’ असा गुजराती भाषेमधील फलक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडला आहे. त्या जागी ‘जय महाराष्ट्र, माझं घाटकोपर, उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे लिखाण केलेला फलक लावण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामराठीबहुल महाराष्ट्रात सर्वच फलक किंवा नावांच्या पाट्या मराठीत असायला हव्यात ! |