मुलुंड येथे १३ वर्षीय मुलीची आत्महत्या !
मुलुंड – येथील १३ वर्षीय मुलीने रेल्वे रुळांवर उडी मारून आत्महत्या केली. शिकवणीवर्गाला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडून ती मुलुंड रेल्वेस्थानकात पोचली. जलद लोकल स्थानकात येत असतांना ती रुळांवर उतरली. लोकल अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ‘आत्महत्येस प्रवृत्त करणारी घटना तिच्या आयुष्यात घडलेली नाही’, असे मुलीच्या पालकांनी सांगितले.