पर्यटकांवर मधमाशांचे आक्रमण !

पुणे – राजगडावर गेलेल्‍या १६ पर्यटकांच्‍या गटावर सकाळी मधमाशांनी आक्रमण केले. यात ४ पर्यटक गंभीर घायाळ झाले असून त्‍यांना चिकित्‍सालयात नेण्‍यात आले आहे. पर्यटकांनी अंगावर मारलेल्‍या सुगंधी अत्तरामुळे मधमाशांनी आक्रमण केल्‍याचा अंदाज ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केला आहे.