परभणी येथे बालविवाह करून अत्याचार करणार्यांवर गुन्हा नोंद !
परभणी – येथील एका १५ वर्षांच्या मुलीशी विवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना १७ सप्टेंबर या दिवशी शहरात घडली होती. या प्रकरणी राजू सावळे या तिच्या पतीविरुद्ध अत्याचार आणि बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यानुसार ५ ऑक्टोबर या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला. यात विवाह लावून देणार्या इतर ११ जणांचा समावेश आहे. पीडित मुलीची या विवाहास सहमती नव्हती; परंतु तिची आई, जयश्री, आशा, कदम आणि जाफरभाई या नावांच्या ४ व्यक्तींनी मिळून तिचा विवाह लावला, अशी तक्रार मुलीने नानलपेठ पोलीस ठाण्यात दिली. पती राजू सावळे याच्यासह १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.