पुणे महापालिकेने घोषित केलेली १ कोटींची पारितोषिके कागदावरच !
पुणे – मिळकतकर भरण्यास मिळकतधारकांना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने १ कोटी रुपयांची विविध पारितोषिके देण्याचे घोषित केले होते. पारितोषिकांच्या वस्तूंची खरेदी न झाल्याने त्यांचे वितरण करण्यात आलेले नाही. महापालिका प्रशासनाने दसर्यापर्यंत वस्तूंचे वितरण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पारितोषिके कागदावरच राहिली आहेत.
चालू आर्थिक वर्षातील मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने ‘मिळकतकर लॉटरी’ योजना घोषित केली होती. लॉटरीनंतरही पारितोषिके देण्यात न आल्याने महापालिकेवर टीका करण्यात आली. पारितोषिकांच्या गाड्या आणि अन्य वस्तूंची खरेदी झाली नसल्याने गणेशोत्सवात पारितोषिके दिली जातील, असे महापालिकेकडून घोषित करण्यात आले होते; मात्र गणेशोत्सवानंतरही पारितोषिके प्राप्त झाली नाहीत.