अफगाणिस्तानातील भूकंपामध्ये आतापर्यंत २ सहस्र ५२ लोकांचा मृत्यू
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये ७ ऑक्टोबरला झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत अनुमाने २ सहस्र ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम अफगाणिस्तानमधील इराण सीमेजवळ रिक्टर स्केलवर ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक घायाळही झाली असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे हेरात शहरापासून सुमारे ४० किमी दूर असलेली अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेक इमारतींची हानी झाली आहे.
The death toll from Saturday’s powerful 6.3 magnitude earthquake in #Afghanistan rose to 2,000. https://t.co/7X0SXHNiQr
— IndiaToday (@IndiaToday) October 8, 2023