‘मोसाद’ असूनही इस्रायलवर आक्रमण का झाले ?
(‘मोसाद’ ही इस्रायलची जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणा आहे.)
पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटद्वारे शक्तीशाली आक्रमण केले. या घटनेला २४ घंट्यांहून अधिक काळ लोटला, तरी परिस्थिती इस्रायलच्या नियंत्रणात आलेली नाही. ज्या देशाचे तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचे उदाहरण जगभर दिले जाते, अशा इस्रायलसाठी ही गोष्ट चिंतेची आहे. ‘मोसाद’सारखी गुप्तचर यंत्रणा असतांना इस्रायलवर हमासने आक्रमण केले, हे आश्चर्यजनक आहे. इस्रायलने गाझा सीमेवर अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था केली आहे, सीमेवर कुंपण घातले आहे, अत्याधुनिक सेन्सर्स बसवले, तरीही हमासच्या आतंकवाद्यांना घुसखोरी करण्यात यश आले. ‘या आक्रमणासाठी आपण दीर्घकाळ सिद्धता केली होती’, असा दावा हमास करत आहे. ‘जगातील सर्वांत बलवान गुप्तचर संस्था ‘मोसाद’ला या आक्रमणाविषयी काहीच सुगावा कसा लागला नाही ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१. ‘हमास’चे आतंकवादी इस्रायलमध्ये कसे घुसले ? आणि त्याची नियोजनबद्धता :
‘हमास’ने एक चलचित्र प्रसारित केले आहे. त्यामध्ये हमासचे आतंकवादी इस्रायलच्या ‘इरेझ क्रॉसिंग’वर (गाझा पट्टा आणि इस्रायल यांच्यामधील एकमेव पादचारी मार्गावर) नियंत्रण मिळवतांना दिसत होते. हमासच्या आतंकवाद्यांनी आधी बाँबफेक करून अडथळे तोडले आणि नंतर गोळीबार करून इस्रायलच्या भागात प्रवेश केल्याचे चलचित्रामध्ये दिसत आहे. हे चलचित्र पहातांना हमासने या घुसखोरीची योजना किती नियोजनपूर्वक केली असेल, याची कल्पना येते.
हमासच्या आतंकवाद्यांनी एकाच वेळी भूमी, अवकाश आणि पाणी यांतून घुसखोरी केली. अनेक दिवस याच्या सिद्धतेसाठी लागले असणारच, त्याविना इस्रायलवर असे आक्रमण करणे शक्य नाही. तरीही इस्रायलच्या सुरक्षायंत्रणांना याचा सुगावा न लागणे, हे धक्कादायकच म्हणावे लागेल.
२. ‘हमास’ची स्वतःची क्षेपणास्त्र यंत्रणा :
हमासने आणखी एक चलचित्र प्रसारित केले आहे. त्यामध्ये त्याचे आतंकवादी प्रशिक्षण घेत आहेत. तसेच हमासने स्वतःची क्षेपणास्त्र प्रणालीही बनवली आहे. ती प्रणाली आतंकवाद्यांनी इस्रायल विरुद्ध वापरली असून त्याद्वारे त्यांनी इस्रायलवर आक्रमण केल्याचे या चलचित्रात दिसते. इस्रायलमध्ये घुसखोरी केल्यानंतर ‘रानजुम’ नावाच्या या लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीची (‘शॉर्ट रेंज मिसाईल सिस्टिम’ची) छायाचित्रे हमासने प्रसारित केली.
३. मोसाद अयशस्वी का ? :
अनेक संरक्षणतज्ञ सांगत आहेत की, इस्रायलच्या सुरक्षेत ही मोठी त्रुटी रहाण्यामागे अतीआत्मविश्वास आणि निष्काळजीपणा ही प्रमुख कारणे असू शकतात. हमासने ७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी इस्रायलवर आक्रमण केल्यानंतर इस्रायली सुरक्षा दलांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळेच हमासने इस्रायलमध्ये घुसखोरी करत काही इस्रायली नागरिकांनाही ओलीस ठेवले. हमासने प्रसारित केलेल्या इस्रायलमधील छायाचित्रांवरून असे दिसून येते की, या काळात त्यांना कुठेही इस्रायली सुरक्षा दलांकडून प्रतिकाराचा सामना करावा लागला नाही.
(साभार : सामाजिक माध्यम)
इस्रायलवर आताच प्रचंड आक्रमण का झाले ? यांमागील काही कारणे१. सौदी अरेबियाला सर्वांत मोठा धोका इराणचा आहे. २. इराण मोठ्या प्रमाणावर विनाशकारी अण्वस्त्रे बाळगण्याच्या उंबरठ्यावर आहे. ३. इराणचा मुकाबला करण्यासाठी सौदीला स्वतःचा बाँब हवा आहे आणि तो अमेरिकेच्या संमतीविना शक्य नाही. ४. इस्रायलशी शांतता आणि ‘ओपेक’द्वारे (पेट्रोलियम पदार्थ निर्यात करणार्या देशांची संघटना) तेलाच्या किमतींविषयी सहकार्य, या अमेरिकेच्या दोन अटी आहेत. ५. सौदीला इस्रायलशी कोणतीही समस्या नाही. त्यामुळे शांतता करार पूर्णपणे अर्थपूर्ण आहे. ६. सौदी आणि इस्रायल यांच्यातील ‘शांतता करार’ जवळपास पूर्ण झाला आहे. केवळ काही औपचारिकता शेष आहेत. ७. जर इस्रायल सौदीमध्ये शांतता करार झाला, तर पॅलेस्टिनी आणि इराण बेरोजगार होतील. ८. इराणची चिथावणी आणि त्याच्या साहाय्याने पॅलेस्टिनींनी ७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर जोरदार आक्रमण केले. ९. इस्रायलकडून कठोर प्रत्युत्तर मिळणे, हा या आक्रमणाचा उद्देश आहे, जेणेकरून इस्लामी देशांना भडकवता येईल आणि सौदीला इस्रायलशी करार करता येणार नाही. १०. एकदा इस्रायलने प्रत्युत्तर दिले आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने मृतांचा आकडा वाढला की, मिडिया (प्रसिद्धीमाध्यमे) ‘मुसलमानांचा नरसंहारा’चा ‘नॅरेटिव्ह सेट’ (खोटे कथानक) करणार ! अशा प्रकारे इस्रायल आणि सौदी यांच्यातील शांतता करार मोडित काढता येणार. (साभार : ‘अफशाईन इमराणी’ यांच्या ‘एक्स’ खात्यावरून) इस्रायलला शत्रूला घरात घुसून मारण्याचा पूर्ण अधिकार !खरेतर इस्लामी जगताला शांतता हवी असल्यास सौदी-इस्रायल करार होणे आवश्यक आहे. इस्लामी राष्ट्रेच नाही, तर भारतासाहित जगभरातील ‘सो-कॉल्ड लिबरल’ (कथित उदारमतवादी), शांतताप्रिय असल्याचा आव आणणारे मुसलमान ‘सौदी विरुद्ध हमास’ यात काय भूमिका घेतात, यावरून उर्वरित जगाला खरा संदेश मिळणार आहे. इस्रायलला स्वतःच्या नागरिकांचे रक्षण आणि देशाच्या शत्रूला घरात घुसून मारण्याचा पूर्ण अधिकार आहे अन् तसे तो करणारच ! (साभार : ‘राईट विंग ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘अफशाईन इमराणी’ यांच्या ‘एक्स’ खात्यावरून) |