सिंधुदुर्ग : कोलगाव येथे लहान मुलाला भटक्या कुत्र्याचा चावा

कु. अक्षय महेश धुरी (चित्र सौजन्य : सिंधुदुर्ग 24 तास)

सावंतवाडी : कोळगाव धुरी टेम येथील अक्षय महेश धुरी हा मुलगा घराबाहेर बसलेला असतांना त्याचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.

सध्या भटके कुत्रे घोळक्याने फिरत असल्याने त्याचा लहान मुले आणि वयोवृद्ध यांना त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कुत्र्यांची नसबंदी करावी. यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तसे निर्देश आणि आर्थिक तरतूद करून सर्वसामान्यांना भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे राजू मसुरकर यांनी दिली.

संपादकीय भूमिका

भटक्या कुत्र्यांनी आणखी जणांना चावा घेण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस कृती करावी !