ईश्‍वरावर श्रद्धा ठेवल्याने नैराश्यासारखे सर्व रोग बरे होणे किंवा ते न होणे !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘श्रद्धा म्हणजे काय ? श्रद्धा याचा अर्थच ही सृष्टी निरर्थक नाही. येथे कुठे तरी भल्याबुर्‍यांची नोंद होते; दखल घेतली जाते. या सृष्टीचा निर्माता आणि नियंता अशी एक महान शक्ती आहे; तिलाच ‘परमात्मा’, असे म्हणतात. भगवंतावरील श्रद्धा कोलमडली, तर मानवी मन आत्यंतिक निराशेच्या गर्तेत कोसळते आणि तडफडते. त्याची जगण्याची प्रेरणाच नाहीशी होते. हा जो आजच्या जगात नैराश्य (‘डिप्रेशन’) हा असाध्य रोग बोकाळला आहे, तो ईश्‍वरावर श्रद्धा नसल्याने जडतो. मग नैराश्यापासून (‘डिप्रेशन’पासून) सुटका करून घेण्यासाठी माणसे मादक पदार्थांकडे वळतात. झोपेची औषधे घेतात. हे यावरील तोडगे आहेत का ? श्रद्धेने हे सगळे रोग पहाता पहाता बरे होतात. नव्हे, तर असे रोगच होत नाहीत. खरोखर श्रद्धा हे औषधच आहे. (Clear cut medicine आहे हे.)’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २०२३)