कर्नाटकने धरणासाठी काढलेली निविदा अर्थहीन ! – महाधिवक्ता पांगम
म्हादई जलवाटप तंटा
पणजी, ६ ऑक्टोबर (वार्ता.) : कर्नाटकने कळसा धरण प्रकल्प उभारण्यासाठी काढलेल्या निविदेला कोणताही अर्थ रहात नाही; कारण हे प्रकरण सध्या सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट झालेले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला अनुज्ञप्ती न घेता कळसा-भंडुरा धरण प्रकल्प उभारता येणार नसल्याची चेतावणी दिली आहे. गोवा सरकारची म्हादईप्रश्नी प्रविष्ट केलेली याचिका सर्वाेच्च न्यायालयात ११ नोव्हेंबर या दिवशी सुनावणीला येणार आहे, अशी माहिती गोव्याचे महाधिवक्ता जनरल देविदास पांगम यांनी दिली आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
कर्नाटकने कळसा धरण प्रकल्प उभारण्यासाठी निविदा काढल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित झाले होते. या पार्श्वभूमीवर महाधिवक्ता देविदास पांगम यांनी ही माहिती दिली.
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦