देशात नथुराम गोडसे यांचे नाव घेतलं तरी जगभरात गांधीजींचेच नाव आहे ! – बाबा आढाव
दापोडी – येथील ‘भटक्या विमुक्त प्रतिष्ठा’न संघाच्या कार्यक्रमांमध्ये बोलतांना बाबा आढाव यांनी देशात नथुराम गोडसे यांचे नाव घेतले, तरी जगभरात गांधीजींचेच नाव आहे, त्याचे काय कराल ? असा प्रश्न सत्ताधारी नेत्यांना विचारला. (नथुराम गोडसे यांचे नाव देशात एक देशभक्त म्हणून परिचित आहे. देशभक्तांचे नाव देशवासियांच्या स्मरणात रहाते. – संपादक) देशाला इंडिया, भारत कि हिंदु राष्ट्र म्हणायचे हे महत्त्वाचे नसून इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न भेडसावत आहेत. (देशात अनेक प्रश्न असले, तरी देशाचे एक सुयोग्य नाव अंतिम करणेही आवश्यक आहे. – संपादक) तरुणांना रोजगार मिळत नाही. ते आरक्षणाच्या पाठीमागे लागले आहेत. महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. नेत्यांना सत्तेची भूक असल्याने ते वारंवार पक्ष बदलतात. असं असलं तरीही आगामी निवडणुका जिंकण्यासाठी हे सर्व चालू आहे असेही आढाव म्हणाले.