श्राद्धात जेवण कसे वाढावे ?
१. पितृपात्रास (पितरांसाठीच्या पानास) उलट्या दिशेने (घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने) भस्माची रेघ काढावी.
२. जेवण मोहाच्या पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर वाढावे.
३. श्राद्धीय ब्राह्मणांच्या पानात मीठ वाढू नये.
४. पक्वान्ने (लाडू वगैरे) हातानेच वाढावीत; पण भाजी, कोशिंबीर, चटणी इत्यादी पदार्थ हाताने न वाढता ते पळी, चमचा यांनी वाढावेत.
५. पानावर पदार्थ वाढण्याचा क्रम आणि त्याची जागा
श्राद्धदिनी पानाच्या डाव्या, उजव्या, समोरील आणि मध्य अशा चारही भागांतील (चौरस) पदार्थ सांगितलेले आहेत.
अ. प्रारंभीला पानास तूप लावावे.
आ. मध्यभागी भात वाढावा.
इ. उजवीकडे खीर, अळू आणि फळभाजी वाढावी.
ई. डावीकडे लिंबू, चटणी आणि कोशिंबीर वाढावी.
उ. समोर सांबार (आमटी), कढी, पापड, कुरडई, भजी आणि माषवटक (उडदाचे वडे), लाडू हे पदार्थ असावेत.
ऊ. शेवटी भातावर तूप आणि वरण वाढावे.
६. जेवण वाढतांना एकाला अल्प आणि दुसर्याला अधिक, एकाला चांगले अन् दुसर्याला निकृष्ट, असे करू नये. श्राद्धाच्या दिवशी तर असा भेदभाव मुळीच करू नये.
७. श्राद्धविधी पूर्ण झाल्याविना लहान मुले, अतिथी यांना वा इतर कुणालाही अन्न देऊ नये.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)