जगभरात स्वहिताचे वातावरण निर्माण करण्यासाठी चीनकडून अब्जावधी डॉलर खर्च (China narrative) !
|
वॉशिंग्टन (अमेरिका) – चिनी सरकार त्याच्या हिताचे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी जगभरात अब्जावधी डॉलर खर्च करत असल्याची माहिती अमेरिकेतील एका अहवालात देण्यात आली आहे. या माध्यमातून तैवान, मानवाधिकार, दक्षिण चीन सागर आणि चिनी अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित, तसेच चीनला मारक असलेल्या बातम्या दाबण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चीन रशियासमवेतही सूचना क्षेत्रात कार्य करत आहे. या माध्यमातून चीनला जगभरात त्याच्या हिताचे वातावरण निर्माण करता येणार आहे.
पाकिस्तान की मीडिया पर ‘कब्जा’ करना चाहता है चीन! अमेरिकी रिपोर्ट ने किया हैरान करने वाला खुलासाhttps://t.co/jRVAFJDCxN#pakistanmedia #american #China
— India TV (@indiatvnews) October 5, 2023
अहवालात मांडण्यात आलेली सूत्रे,
१. चीन पाकिस्तानी प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी चीन आंतरराष्ट्रीय अभियानाचे एक जाळे विणत आहे.
२. पाक आणि चीन यांच्यातील महत्त्वाकांक्षी आर्थिक योजना, म्हणजेच ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’च्या विरोधात आतंरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे टीका करत आहेत. त्याविरोधात उभय देशांनी ‘सीपेक रॅपिड रिस्पॉन्स इन्फॉर्मेशन नेटवर्क’ नावाच्या अभियानास आरंभ केला आहे. या माध्यमातून ‘चीन-पाकिस्तान मीडिया कॉरिडोर’ कार्यान्वित करण्यात आला आहे.
३. दोन्ही देश त्यांच्या विरोधात करण्यात येणार्या कथित अफवांचे खंडण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. महत्त्वपूर्ण बातम्यांचे उर्दू भाषेत भाषांतरही केले जाणार आहे.
संपादकीय भूमिकाभारतातही चिनी सरकार प्रसारमाध्यमांना हाताशी धरून भारतविरोधी कृत्ये करत आहे. चीनमुळे त्रस्त असलेल्या देशांनी एकत्र येऊन चीनला एकाकी पाडण्याच्या दृष्टीने भारताने पुढाकार घेतला पहिजे ! |