प्राचार्यांना ‘फादर’ म्हणायला लावल्याप्रकरणी ‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान’ने खडसावले !
कल्याण येथील ‘न्यू ज्योत बेथनी इंग्लिश शाळे’तील धर्मद्रोही प्रकार !
ठाणे, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – कल्याण तालुक्यातील रुंदे भागातील ‘न्यू ज्योत बेथनी इंग्लिश’ शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर एका विशिष्ट धर्माच्या संस्कृतीचा प्रभाव टाकला जात आहे, तसेच शिक्षक आणि प्राचार्य यांना ‘फादर’ असे म्हणण्यास सांगितले जात आहे, अशी तक्रार अनेक समाजबांधवांनी ‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान संघटने’कडे केली होती. ‘शाळेत शिक्षकांना ‘सर’ म्हणूनच विद्यार्थीकडून संबोधले जाते. केवळ प्राचार्यांना ‘फादर’ म्हणण्यात येते’, असे प्राचार्यांनी सांगितले. संघटनेच्या कल्याण तालुक्यातील पदाधिकार्यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्राचार्यांची भेट घेऊन निवेदन देऊन खडसावण्यात आले. (धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्या शंभुदुर्ग प्रतिष्ठानचे अभिनंदन ! – संपादक) शाळा प्रशासनाने सांगितले की, संघटनेच्या पदाधिकार्यांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल.
प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी प्राचार्यांना केलेल्या सूचना !
१. राज्यघटनेनुसार या शाळेला मान्यता मिळाली असून शाळेचा कारभार कायद्याच्या नियमांना बांधील राहून चालवावा.
२. शाळेत सर्व धर्मांचे विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण द्यावे. कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडू नये.
३. मुलांना राज्यघटनेनुसार, तसेच प्रांत आणि भाषा यांच्या आधारावर प्राचार्य, तसेच शिक्षक यांना संबोधण्यास सांगावे.
४. शाळेत कोणत्याही धार्मिक प्रतिमा लावू नयेत आणि लावल्यास त्यामध्ये सरस्वतीमाता अन् सर्व महापुरुषांच्या प्रतिमा लावाव्यात.
शंभुदुर्ग प्रतिष्ठानचे पालकांना आवाहन !
शंभुदुर्ग प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केले की, मुलांवर अन्य धर्माच्या संस्कृतीचा प्रभाव पडू नये, तसेच ‘मुले धार्मिक विचारांमध्ये फसून आपल्यापासून दुरावू नयेत’, असे वाटत असल्यास मुलांना शाळेतील घडामोडींविषयी सातत्याने विचारत रहावे. (असे आवाहन करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! पालकांनीच आपल्या पाल्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने सतर्क रहायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिका :
|